कोरोनाची मोफत लस ; केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय

कोरोनाची मोफत लस ; केंद्राचा महत्वपूर्ण निर्णय

जालना : देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॅ. हर्षवर्धन यांनी केली आहे. केंद्राने जाहीर केलेला निर्णय अनपेक्षित असून त्याचे महाराष्ट्र सरकारच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले

संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली. याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत करून केंद्र ज्या काही सुचना देईल त्याचे राज्य सरकारच्यावतीने तंतोतंत पालन केले जाईल.

COMMENTS