“पोलिसांच्या मारहाणीमुळेच नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू !”

“पोलिसांच्या मारहाणीमुळेच नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू !”

पुणे – अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी अटक असलेले आरोपी कैलास गिरवले यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गिरवले पोलीस कोठडीत असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी रात्री ८.५० ला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परंतु गिरवले यांना पोलिसांनी मारहाण केली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अंगावर जखमा होत्या असं ते म्हणाले आहेत.

नगरसेवक गिरवले हे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक मानले जात होते. केडगावमधील शिवेसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी खुनानंतर नगर पोलिसांनी आमदार जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस गिरवले आणि त्यांच्या साथिदारांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर हल्ला करून आमदार जगताप यांना पळवून नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

 

COMMENTS