जेलमधील आरोपीच नगरसेवकाच्या हत्येचा सूत्रधार !

जेलमधील आरोपीच नगरसेवकाच्या हत्येचा सूत्रधार !

पंढरपूर  पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येबाबात धक्कादायक माहिती समोर आली असून हत्येप्रकरणी सूत्रधार म्हणून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव याला कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांची दुपारी एक वाजता गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. तसेच संदीप पवार हे अपक्ष होते. त्यांची आई आणि वडील हे दोघेही पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. संदीप पवार यांचे वडील दिलीप पवार यांचीही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हत्या झाली होती.

दरम्यान ‘सरजी’ या नावाने गुन्हेगारी क्षेत्रात दहशत असलेला गोपाळ अंकुशराव हा भाजपचा जिल्हा परिषद सदस्य असून एका व्यापाऱ्याला धमकावल्या प्रकरणी सध्या तो कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. परंतु पोलिसांच्या तपासानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

COMMENTS