उस्मानाबाद – गोपनिय मतदान पद्धतीचा भंग होत असल्याच्या कारणावरून उस्मानाबाद-लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बीड येथील अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने गुरुवारी (ता. 24) सुनावणी ठेवली आहे. दरम्यान या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. श्री. गमे यांनी कारण स्पष्ट केले नसले गोपनीयतेच्या मुद्यावरुच मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
बीड येथील अपात्र नगरसेवकांनी न्यायालयात याचिका सादर केल्यानंतर त्यांना मतदानाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु त्यांची मतं ही वेगळी ठेवली गेली आहेत. जर विजयामधील फरक हा 10 मतांपेक्षा कमी असेल तरच या मतांची मोजणी होणार होती. त्याला हरकत घेत त्या 10 नगरसेवकांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आमच्या मताला किंमत नाही का ? आणि जर फरक 10 पेक्षा कमी झाला तर आमच्या मतांची मोजणी होईल. मात्र त्यामुळे गोपनियतेचा भंग होईल असे आक्षेप त्यावर घेतले होते. त्यानंतर मतमोजणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी यावर सुनावणी होऊन मतमोजणीची पुढील तारीख निश्चित होईल, अशी चर्चा राजकीय वर्तूळात ऐकायला मिळत आहे.
COMMENTS