मुंबई – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं उद्या भारत बंदची हाक दिली आहे. तसंच या भाववाढिला विरोध असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही उद्याच्या बंदला पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबाच नाही तर सक्रीय सहभाग राहील असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय.
१० सप्टेंबर २०१८ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील 'भारत बंद' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग. pic.twitter.com/Ir9ZPnhIdD
— Raj Thackeray (@RajThackeray) September 9, 2018
काँग्रेसच्या या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे उद्याच्या संपला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तसंच अनेक पक्षांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे उद्या कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे.
COMMENTS