मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयानं तुर्तास दिलासा दिला आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना पर्सनल बाँड भरण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. तसेच ईडीनं केलेल्या नवीन दाव्यांवर ६ अॅगस्टला विशेष पीएमएलए कोर्ट निकाल देणार आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
दरम्यान भुजबळ यांची नाशिक येथील 25 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केलेली असून त्याच्या आधारे ईडीने पीएमएलए कोर्टात नवीन पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. परंतु एकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही. कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकिलांनी कोर्टाला करुन दिली. तर ईडीने आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचं मान्य केलं, परंतु त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने कोर्टाला केली आहे. त्यामुळे यावर 6 ऑगस्टला कोर्ट काय निकाल देणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS