मुंबई : केंद्राने मोफत लसीकरण केलं पाहिजे अशी सगळ्या राज्यांची अपेक्षा आहे. असे झाल्यास मोफत लसीकरण शक्य असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हणाले. मोफत लस मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकार सूचना देईल ती कार्यवाही करु असे ते म्हणाले.
लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी काम राज्य सरकारने करायची ते आम्ही करत आहोत. लॉजीस्टिक,डेटा सगळं आम्ही करत आहोत, लसीकरणाच्या परिणाम त्या बाबत एक युनिट तयार केलं आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. मायक्रो प्लानिंग तयार असून हेल्थ वर्कर्स डेटा, अत्यावश्यक सेवेतील लोक, ५० वर्षावरील इतर आजार असलेले, ५० वर्षाखालील हा सगळा डेटा तयार करत आहोत. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला मेसेज मिळणार, त्यांनंतर त्याची ओळख पटवून त्याला लस दिली जाणार आहे.
आम्ही लसीकरण कार्यक्रम साठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारी पासून लसीकरण सुरू होईल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात आरोग्य, पोलीस, अत्यावश्यक कर्मचारी ५० वर्षांवरील असे पहिल्या टप्यात ३ कोटी लोकं येतील असा अंदाज आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला.
COMMENTS