भारताचे दोन बडे क्रिकेटस्टार लोकसभेच्या रणांगणात, एक मुंबईतून एक दिल्लीतून ?

भारताचे दोन बडे क्रिकेटस्टार लोकसभेच्या रणांगणात, एक मुंबईतून एक दिल्लीतून ?

क्रिकेटपटू किंवा सिनेतारका यांची प्रसिद्धी भारतीय राजकारणात इनकॅश केल्याची उदाहारणे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. पाकिस्तानमध्ये तर इम्रानखान या क्रिकेटपटूने स्वतःचा पक्ष स्थापन करुन देशात सत्ता मिळवली आहे. भारतातही यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात उडी घेतली आहे. नवज्योत सिंग सिद्धू, भारताचा माजी कर्णधार मंहमद अझरउद्दीन, किर्ती आझाद, चेतन चौहान यांच्यासह अनेकांनी राजकारणात आपलं नशीब अजवालं आहे. त्यातले बहुतेक जण राजकारणात काही प्रमाणात का होऊना यशस्वी झाले आहेत. त्यांची लोकप्रियता राजकीय पक्षांच्या पथ्यावर पडली आहे. भारतीय क्रिटेटमधील दोन बडे सितारे आता राजकारणातील त्यांची नवी इनिंग सुरू करतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामध्ये क्रिकेटचा देव म्हटला जाणारे सचिन तेंडूलकर आणि भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर यांचा समावेश आहे.

गौतम गंभीर सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची गरमागरम चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. गेल्या चार वर्षांमध्ये गौतम गंभीरनं मोदी सरकारच्या निर्णयाचं उघडपणे कौतुक केलं आहे. त्यामुळेच त्याला पक्षात प्रवेश द्यायला नेते उत्सुक आहेत. 15 वर्ष दिल्ली विधानसभेवर काँग्रेसचं राज्य होतं. तर गेली साडेतीन वर्ष आम आदमी पार्टीचं राज्य आहे. तसंच गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरीमध्ये सातत्य टिकवण्यासाठी गौतम गंभीरला पक्षाकडून गळ घातली जात असल्याची चर्चा आहे. दिल्लीतून लोकसभेच्या एखाद्या जागेवर त्याला भाजपकडून तिकीटं दिलं जाऊ शकंत. तसंचं लोकसभेनंतर लगेच असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गौतम गंभीरला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही केलं जाऊ शकतं अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे. तशी चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात आहे. सचिन तेंडुलकर हा काँग्रेसकडून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघातून त्याला रिंगणात उतरवण्याची काँग्रेसची रणनिती असल्याचं बोललं जातंय. मात्र सचिनकडून अजून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. सध्या भाजपाचे गोपाळ शेट्टी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. गोपाळ शेट्टी यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी तगड्या उमेदवाराची गरज आहे. काँग्रेसला या मतदारसंगात तसा तडगा उमेदवार नाही. यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले संजय निरुपम यावेळी उत्तर पश्चिम या मतदारसंघातून उत्सुक असल्याचं बोलंलं जातंय.

तसंच सचिन रिंगणात उतरवल्यास शिवसेनेचा आणि मनसेचा पाठिंबा सचिनला मिळेल असा काँग्रेसच्या नेत्यांचा कयास आहे. यापूर्वी जुन्या मुंबई उत्तर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक करत असत. त्यांचीही मतदारसंघावर मजबूत पकड होती. मात्र काँग्रेसनं तिथून बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यावेळी आश्चर्यकारत रित्या गोविंदानं राम नाईक यांचा पराभव केला होता. त्याच धरतीवर सचिन तेंडुलकरला रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. सचिनला यापूर्वी काँग्रेसच्या राज्यात राज्यसभेवर संधी देण्यात आली होती. तसंच त्याला भारत रत्नही काँग्रेसच्या काळातच दिला गेला होता. त्यामुळे तो काँग्रेसकडून लढेल असा अंदाज बांधला जात आहे. मात्र भारत रत्न पुरस्कार मिळलेल्या सचिनकडून काय प्रतिसाद मिळतो त्यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत. राज्यसभेत सचिनची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नव्हती.

COMMENTS