अबब ! मोदी सरकारमध्ये 1179 कोटींचा घोटाळा ?

अबब ! मोदी सरकारमध्ये 1179 कोटींचा घोटाळा ?

नवी दिल्ली – मोदी सरकारमध्ये 1179 कोटींचा घोटाळा झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅगनं दिलेल्या अहवालानुसार सरकारच्या 19 मंत्रालयीन विभागात 1179 कोटी रुपयांचा घोळ असल्याची माहिती दिली आहे. कॅगच्या 2018 च्या अवहवाल क्रमांक 4 नुसार 19 मंत्रालयातून एकूण 1179 कोटी रुपयांचां घोळ करण्यात आली असल्याची माहिती आहे. कॅगच्या या अहवालामुळे देशभरात खळबळ उडाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकमतने दिलेल्या बातमीनुसार 19 मंत्रालयांशी संलग्नीत असणा-या विभागाकडून नियम आणि कायद्यांची मोडतोड करत अनियमितपणे पैसे खर्च करण्यात आले असल्याची माहिती कॅगच्या अहवालात देण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयात सर्वाधिक प्रमाणात पैशांचा घोळ झाला असल्याची माहिती आहे. तसेच, अर्थ मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, ग्राहक, वाणिज्य मंत्रालयांसह एकूण 19 मंत्रालयात नियम डावलून पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान या अहवालासाठी देशातील सर्वात मोठ्या ऑडिट संस्थेने जनरल, सोशल आणि महसूल विभागाशी संबंधित 46 मंत्रालये आणि संबंधित विभागांनी ऑडिट केले असल्याची माहिती आहे. त्यामध्ये 19 मंत्रालयातील 78 प्रकरणांमध्ये घोटाळा असल्याचे समोर आले आहे. तर एका वर्षात एकूण खर्च 38 टक्क्यांनी वाढल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सन 2015-16 मध्ये या मंत्रालयीन विभागांचा खर्च 53,34,037 कोटी रुपये होता. सन 2016 मध्ये 73,62,394 कोटींवर पोहोचला असल्याचं कॅगच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

COMMENTS