मुंबई – डी. वाय. पाटील यांचा 83 व्या वाढदिवसानिमित्त आज सत्कार करण्यात आला. मुंबईतील नेहरू सभागृहात हा कार्यक्रम पार पडला असून या सत्कार समारंभाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण, पंकजा मुंडे, विनोद तावडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी या नेत्यांनी डी वाय पाटील यांच्याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केला.
दरम्यान यावेळी बोलत असताना डी. वाय पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. शरद पवार यांच्यांमुळे मी आमदार झालो, तर प्रतिभा पाटील यांच्यामुळे मी राज्यपाल झालो असल्याचं ते म्हणालेत. तसेच कर भरण्याएवढी मालमत्ता मी माझ्याजवळ ठेवलेली नसून पेन्शन आणि माझी मुलं मला महिन्याला पैसे देतात त्यावर माझं व्यवस्थित चालतं. तसेच दररोज माझ्याकडे 10 ते 20 लोक जेवायला असतात ते मला व्यसन आहे, इतर कुठलंही व्यसन मला नाही असंही यावेळी डी वाय पाटील यांनी म्हटलं आहे.
यावळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डी वाय पाटील यांच्यावर कविता केली. तसेच मी इथे आलो तेव्हा नितीन गडकरी आले नव्हते तेव्हा पूर्वीच्या परिवारात आलो की काय असं वाटायला लागलं होतं. पूर्वी मी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर होतो, आता मोदी गडकरींबरोबर आहे.
नितीन गडकरी
सरकारी महाविद्यालयांपेक्षा खाजगी महाविद्यालये गुणवत्तेत चांगली आहेत.सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असेल तिथे जास्त यश असतं. सरकारने धोरणं तयार करावीत संस्था चालवणं सरकारचं काम नाही. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचा निर्णय किती योग्य आहे ते पटते.
डीवाय पाटील यांनी 45 हजार क्षमतेचे स्टेडियम बांधले. पण ते फायदेशीर नव्हते हे माझ्या लक्षात आले. परंतु त्यांची शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राबद्दल असलेली आस्था त्यातून दिसली. आमच्या सरकारने ठरवलंय वैद्यकीय महाविद्यालये सरकारी आणि खाजगी भागिदारीतून उभी करायची. सरकारी दवाखान्याची अवस्था कुठलंही सरकार असले तरी दयनीय आहे. नर्स आहे तर डॉक्टर नाही अशी अवस्था असल्याचं मतही यावेळी गडकरींनी व्यक्त केलं आहे.
COMMENTS