मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दादरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोर्चादरम्यान काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा होऊ शकला नाही.
दरम्यान दादरमधील राड्यानंतर मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी माझ्या घराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का? कोणत्या नियमाने त्यांना ताब्यात घेतलं जातंय? जमावबंदी लागू केलीय का? असे सवाल निरुपम यांनी पोलिसांना विचारले आहेत.
To @CPMumbaiPolice Why the party workers r being picked up frm my building premises?Under what rule?Is 144 imposed in my building premises?
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 1, 2017
COMMENTS