जालना – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत असल्याचं दावने यांनी म्हटलं आहे. दानवेंनी विरोधकांचा उल्लेख चोट्टे म्हणजेच चोर असा केला आहे. जालन्यातील विकासकामांच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले असंही दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत. आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असं म्हणू लागलेत. का तर मी मोदींजीचा माणूस आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून विरोधकांकडून आता दानवेंवर टीका केली जात आहे.
COMMENTS