मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठ्या प्रमाणात चर्चीला गेलेली भेट अखेर मातोश्रीवर झाली. या बैठकीला भाजपकडून शहा यांच्याशिवाय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही या बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी दानवे यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला. त्यामुळे दानवे यांना मधूनच परत पाठण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. हे खोडसाळपणाचं वृत्त असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे मातोश्रीवर फक्त मुख्यमंत्री जाण्याचं ठऱलं होतं. माधुरी दीक्षित आणि आशिष शेलार यांच्या घरी आपण जाणार होतो. मातोश्रीवर बैठकीच्यावेळी भाजपची वेगळी बैठक होती. त्याबैठीकमध्ये आपण व्यस्त होतो असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे.
COMMENTS