नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज घेतली. या भेटीनंचर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक कारखान्यांचे अकाउंट एनपीएमध्ये गेले आहेत. बँका पैसे उपलब्ध करून देत नाहीत. शेतकरी पण त्यामुळे अडचणीत येऊ शकतो यासाठी सरकारने काय केले पाहिजे. यासाठी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. मी जरी मंत्री असलो तरी आम्ही इतकी वर्ष अनेक ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. या महिन्यात त्यांचे मला साखरेच्या प्रश्नाबाबत तीन फोन आले होते.
तसेच कांद्याबद्दल निर्णयामुळे शेतकरीही नाराज आहे. मंगळवार नंतर आम्ही या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटणार आहोत. किती लोकांना कोरोनामुळे भेटीची परवानगी मिळते हे कळेल असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत त्यांच्या दारात उभे राहिले आणि मी माझ्या दारात उभा राहिलो तर एकमेकांना दिसतो इतके आम्ही जवळ आहोत. इतकी सहज ही भेट आहे. कोरोनाशिवाय कुठलीही चर्चा आमच्यात झाली नाही. आम्ही एकमेकांना नेहमी भेटत असतो. महाराष्ट्रातल्या कोरोनाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं. काय काय करता येईल याबद्दल आम्ही बोललो असल्याचंही दानवे म्हणाले.
COMMENTS