संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने कारवाई करण्याची गरज – दरेकर

संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने कारवाई करण्याची गरज – दरेकर

मुंबईः ‘सामनाच्या अग्रलेखातून बेजबाबदार टीका केली तसंच, नेत्यांवर आक्षेप घेतले ते आपण राजकीय टीका-टिप्पणी म्हणून समजून घेऊ. परंतु, या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायव्यवस्था केली आहे. या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत असे आक्षेप घेतले जात असतील तर यापेक्षा दुर्देव न्यायव्यवस्थेचं असू शकतं नाही. त्यामुळं न्यायव्यवस्थेनं दखल घेण्याची गरज आहे,’ अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. संजय राऊत यांचं वक्तव्य बेताल आणि बेजाबदार आहे. आता तर न्यायालयाने काय केलं पाहिजे ते राऊत सांगताहेत. संजय राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे, अशीही टीका केली आहे.

मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. अशी टीका करतानाच राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/mipravindarekar/status/1339487261759397888?s=20

COMMENTS