मुंबई – विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मतं राखू शकलेली नाही. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे नक्की काय भविष्य असेल हे स्पष्ट होते”, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट् विट करून केली.
विधान परिषदेच्या धुळे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा ३३२ मतांसह विजय झाला. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघाची मोजणी सुरू आहे. सकाळी धुळे-नंदुरबारचा निकाल लागल्यानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर खरमरीत टीका केली.
विजयी उमेदवार अमरिश पटेल यांचं अभिनंदन करणारं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं. याच ट्विटमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मतं राखू शकलेली नाही. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे नक्की काय भविष्य असेल हे स्पष्ट होते”, असे टीका त्यांनी केली.
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्के ही मतं राखु शकली नाहीत यावरून ऊद्याचे महाविकास आघाडीचे काय भविष्य राहील हे स्पष्ट होतय, @BJP4Maharashtra चे उमेदवार श्री अमरीश पटेल यांचे तसेच सर्व मतदारांचे त्रिवार अभिनंदन!@TV9Marathi @TheMahaMTB
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 3, 2020
COMMENTS