मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती आहे. दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकी देण्यात आली असून दुबईहून तीन ते चार वेळा कॉल आला असल्याची माहिती आहे. या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत.दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून ही धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या असल्याची माहिती आहे.
दरम्यान दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.
COMMENTS