मुंबई – मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात बलात्काराच्या दोषींना कडक शिक्षा देणारं विधेयक पास केलं आहे. 12 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झालेल्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद त्या विधेयकामध्ये आहे. त्याच धरतीवर महाराष्ट्रातही कडक कायदा करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे.
राज्यात महिला किंवा लहान मुली सुरक्षीत नाहीत. केवळ कायद्यामध्ये थोडेएफार बदल करुन गुन्ह्यांचं प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची तरतूद केल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल आणि आरोपींपर्य़ंत कडक संदेश जाईल असं शिवसेनेला वाटतंय. सामना या मुखपत्रातून शिवसेनेनं ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रात गाजलेल्या कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ही मागणी केली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची फडणवीस सरकार कशा प्रकारे प्रतिसाद देतं ते पहावं लागेल. मध्य प्रदेश सरकारनं 26 नोव्हेंबरला याबाबतचं विधेयक मंत्रिमंडळात मंजुर केलं होतं. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ते पारीत केलं जाणार आहे. तु्म्हाला याबाबत काही मतं व्यक्त करयाची असतील तर आम्हाला [email protected] या आयडीवर मेल करा.
COMMENTS