मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. येत्या सोमवारपासून दररोज दोन ते पाच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – वर्ष 2017 या नावाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहता येते.
राज्य सरकारच्या aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईटवरील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – वर्ष २०१७ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे स्वतंत्र पेज ओपन होईल. यातील लाभार्थ्यांची यादीया पर्यायावर क्लिक करा. लाभार्थ्यांची यादी पर्यायावर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या नव्या पेजवर तुमची माहिती भरा. माहिती भरल्यानंतर कर्जमाफी झाली असल्यास तुमचे नाव दिसेल.
COMMENTS