मुंबई – भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
भंडाऱ्यातील जिल्हा रूग्णालयात शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. या दु्र्दैवी घटनेतील मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. टोपे म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. “
दरम्यान, भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले.
COMMENTS