धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर गडचिरोलीतील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मिळाला न्याय!

धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर गडचिरोलीतील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मिळाला न्याय!

मुंबई – 1 मे रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट केला होता. ज्यात १५ जवानांनी प्राण गमावले. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांस निलंबीत करण्यात येत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच तसेच शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीस नौकरी देण्याची कारवाई 8 दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले आहे.

दरम्यान पोलीस उपअधीक्षक शैलेश काळेंवर कडक कारवाईची / निलंबनाची मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचीही मागणी केली. या दोन्ही मागण्या केसरकर यांनी मान्य केल्या आहेत.

गडचिरोलीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाले होते.  याबाबत लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुरक्षेचे नियम पाळले न गेल्यामुळे झालेल्या या हल्ल्याला पोलीस उपअधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.

या नक्षलवादी हल्ला प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल सरकारला प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितलं.

COMMENTS