पुणे – पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दीपक मानकर हे एक गुन्हेगारी टोळीचे मुख्य असून या टोळीचे काम धमकावून आणि दहशत पसरवून जमिनीवर ताबा घेणे आणि त्या जमिनीपासून आर्थिक फायदा मिळवणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. दीपक मानकर यांच्यावर यापूर्वी ही लँड ग्रॅबिंगचे खटले न्यायालयात सुरू आहेत .त्यामुळे त्यांच्यावर संघटित गुन्हेगीरी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान दीपक मानकर हे राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच पुण्याचे माजी उपमहापौर आहेत. पुण्यातील व्यावसायीक जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी मानकरवर गुन्हा दाखल आहे. २ जूनला जगतापनं रेल्वे खाली आत्महत्या केली होती. आपल्या आत्महत्येस दीपक मानकर जबाबदार असल्याची चिठ्ठी जगतापने लिहून ठेवली होती. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी मानकर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला. अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर १० दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार ते काल पोलिसांना शरण आले. अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.
COMMENTS