माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी रुग्णालयात दाखल

माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली – ब्रेन हॅमरेज झाल्याने माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले होते.

रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्‍टरने नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांचा आजार गंभीर नसल्याचे सांगितले आहे. अँटोनी हे बुधावारी राहत्या घरी चक्कर येऊन कोसळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अँटोनी यांनी केरळचे मुख्यमंत्री आणि संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

 

COMMENTS