मुंबई – राज्यातील विविध विषयांबाबत आज दिल्लीत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलीआहे. या बैठकीमध्ये राज्य काँग्रेसबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील काँग्रेसमधील संघटनात्मक फेरबदल, विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा आणि काँग्रेसकडून राबवण्यात येणाऱ्या भाजपाचे चार साल, देश की जनता बेहाल हा कार्यक्रम राज्यात राबविण्याविषयी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
दरम्यान राज्याचे नवनियुक्त प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील काँग्रेसचे काही जिल्हाध्यक्ष बदललेले जाणार आहेत, त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तसेच विधानपरिषदेसाठी उमेदवार निवडताना जुन्या नेत्यांना पुन्हा संधी न देता नवीन चेहरा देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
COMMENTS