भाजपला धक्का, दिल्लीच्या माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी !

भाजपला धक्का, दिल्लीच्या माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी !

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असून दिल्लीतील काँग्रेसचे माजी मंत्र्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले अरविंदर सिंह लवली यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये पुन्हा घरवापसी केली आहे.

https://twitter.com/SurajSolanki/status/964755866292334592

दरम्यान एमसीडी निवडणुकीच्या अगोदर अरविंदर सिंह लवली यांनी नाराज होऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठांवर नाराज होऊन त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना शिला दीक्षित यांनी गद्दार असं म्हटलं होतं.

COMMENTS