नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारनं महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत बस आणि मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरु करण्यात आला आहे. या महिलांच्या प्रवासाचा पूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास केल्यास महिला सुरक्षित राहतील असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. याशिवाय शहरात ७० हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान डीटीसी आणि मेट्रोमध्ये कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाऊ शकते याची माहिती मिळवण्यासाठी मी सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितलं असून अधिकाऱ्यांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. दोन ते तीन महिन्यात अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लोकांकडूनही सूचना मागवल्या आहेत’, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
Delhi CM: Subsidy won't be imposed on anyone. There are several women who can afford these modes of transport. Those who can afford, can purchase tickets, they needn't take subsidy. We encourage those, who can afford, to buy tickets¬ take subsidy so that others could benefit. https://t.co/QHtqfvBjiR
— ANI (@ANI) June 3, 2019
तसेच ज्यांना तिकीट खरेदी करणं शक्य आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये अशी विनंतीही केजरीवाल यांनी केली आहे. अनेक महिलांना मेट्रो किंवा बसने प्रवास करणं परवडतं. त्य2मळे ज्यांना तिकीट खरेदी करणं शक्य आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकीट खरेदी करावं. ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांना लाभ घेऊ द्यावा’ असं आवाहनही केजरीवाल यांनी केलं आहे.
COMMENTS