नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी सुरु असून दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 57 जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. भाजप फक्त 13 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.
दिल्लीतील विजयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यालयात नवे पोस्टर्स झळकत आहेत. या पोस्टरवर राष्ट्रनिर्मितीसाठी आपला साथ द्या असा आशय लिहिला आहे. मिस्ड कॉल देऊन आपचे सदस्य व्हा अशी मोहीम आता आपनेही सुरु केली आहे. “दिल्ली तो हमारी है अब देश की बारी है” असा नवा नारा आपनं दिला आहे.
यावरुन मतदानानंतर काही संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरत असल्याचं दिसत आहे.
एक्झिट पोल
एबीपी सीव्होटर्सचा एक्झिट पोल
एबीपी सीव्होटर्सच्या सर्व्हेनुसार आपला ५६, भाजप आघाडीला १२ आणि काँग्रेस आघाडीला केवळ दोन जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.
टाइम्स नाऊचा एक्झिट पोल
टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार आपला ४७ तर भाजप आघाडीला केवळ २३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
जन की बातचा एक्झिट पोल
जन की बातच्या सर्व्हेत आपला ५५ आणि भाजप आघाडीला केवळ १५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
न्यूज एक्स नेताचा एक्झिट पोल
न्यूज एक्स नेतानेही आपला ५५ जागा दिल्या असून भाजप आघाडीला १४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
इंडिया न्यूज नेशनचा एक्झिट पोल
इंडिया न्यूज नेशन सर्व्हेनेही आपला ५५ जागा दिल्या असून भाजप आघाडीला १४ जागा असा अंदाज वर्तवला होता.
न्यूज एक्स-पोलस्टारचा एक्झिट पोल
न्यूज एक्स-पोलस्टारच्या सर्व्हेत आपला ५६ जागा आणि भाजपला १४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
सुदर्शन न्यूजचा एक्झिट पोल
सुदर्शन न्यूजने आपला ४२, भाजप आघाडीला २६ आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
इंडिया टीव्हीचा एक्झिट पोल
इंडिया टीव्हीने आपला ४४ आणि भाजप आघाडीला २६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता.
COMMENTS