औरंगाबाद – नामांतराचा विषय म्हणजे सेनेचे नाटक आहे, सेना फक्त प्रस्ताव पाठवते भूमिका काय घेत नाही, ही सगळी नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व ठरवून करतंय, असं टीकास्त्र यांनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सोडले.
शिवसेनेने आता औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करा, अशी मागणी केली आहे. म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होतील. काँग्रेसने नामांतर करू नका असे म्हणायचे, म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खूश होती. निवडणुका आल्यामुळे नूराकुस्ती आता सुरू झालीय. दोघांनाही या बाबतीत कुठलंही गांभीर्य नाहीये. केवळ हे एक प्रकारचे नाटक सुरू आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
औरंगाबादमध्ये इतकी वर्षं सत्ता चालवूनही कुठलंही महत्त्वाचं काम न करता आल्यानं अशा प्रकारची भाषा या ठिकाणी चाललेली आहे. नुसते पत्र पाठवत असतात, बाकी कुठलीही कारवाई ते करत नाहीत. केवळ निवडणुका आल्यानंतर या गोष्टी का आठवतात, असंही फडणवीस म्हणालेत.
औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार
औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी भाजपने 1995 पासून चार प्रस्ताव औरंगाबाद पालिकेत दिले होते. स्मरणपत्रेही दिले. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच जेव्हा जेव्हा औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शिवसेनेने कच खाल्ली. त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी दिसून आली, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला होता.
COMMENTS