भोसरी गैरव्यवहारप्रकरणी खडसेंसोबत फडणवीसांची चौकशी

भोसरी गैरव्यवहारप्रकरणी खडसेंसोबत फडणवीसांची चौकशी

पुणेः भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कारवाईमुळे राज्याचे राजकारण तापले असताना या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहारप्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच खडसे यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा ईडीने खडसे यांची चौकशी सुरु केली आहे.

याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब घ्यावा, अशी न्यायालयात मागणी केली आहे. वकील असीम सरोदे यांच्यामार्फत लेखी मागणी दमानिया यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तर, कोणत्या नियमाच्या आधारे मिनिट्स ऑफ मिटिंग रद्द केले जाऊ शकतात?, असा सवालही दमानिया यांनी केला आहे. ही संपू्र्ण प्रक्रिया शंकास्पद असून कोणाचे जबाब घेणं कायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत याची यादीच त्यांनी न्यायालयात सादर केली आहे.

COMMENTS