मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने निधी वितरित करण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करावा अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.
मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. pic.twitter.com/lM8TVFHSmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात गेली आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याची विनंती फडणवीसांनी केली आहे. यावर राज्यपाल यांनीही तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याची माहिती आहे.
COMMENTS