मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रात अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये सीतारमण यांनी काही काळ संरक्षण मंत्रालयही सांभाळलं आहे. परंतु सीतारमण यांच्या कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीसे नाखुश असल्याचं म्हटलं जातं. अर्थसंकल्पानंतर मोदींच्या नाराजीत भर पडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सुपूर्द केली जाण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी होणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही विरोधी पक्षनेतेपद दिलं जाण्याची शक्यता आहे.चंद्रकांत पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवलं गेल्यास भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS