40 हजार कोटींचा निधी परत दिला का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

40 हजार कोटींचा निधी परत दिला का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मुंबई – भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 80 तास मुख्यमंत्री असताना शेतकरी मदतीचा 5 हजार कोटी रुपयांच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय झाला नाही. झालेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. असे पैसे केंद्र सरकार थेट देत नसतं आणि असा पैसा राज्य सरकार परत पाठवू शकत नाही,व्हॉट्सऍप फॉरवर्ड बातमीवर पुराव्यानिशी बोलणं केव्हाही योग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करून 80 तासात केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवल्याचा दावा भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे. फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचा 40 हजार कोटींचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटींचा गैरवापर केला असता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर येऊन त्यांनी केंद्राचा निधी परत पाठवल्याचं अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं आहे. हा आरोप फडणवीस यांनी फेटाळला आहे.

COMMENTS