नाणार रिफायनरीबाबत प्रत्यक्ष करार नाही –मुख्यमंत्री

नाणार रिफायनरीबाबत प्रत्यक्ष करार नाही –मुख्यमंत्री

मुंबई – नाणारमधील तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी सौदी अरेबियन कंपनीबरोबर केंद्र सरकारनं करार केला असल्याची माहिती आहे. परंतु नाणार किंवा अन्य रिफायनरीबाबत प्रत्यक्ष करार झाला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असल्याची माहिती आहे. नाणारबाबत राजकीय वर्तुळात वाढत असलेला विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच नाणार प्रकल्प व्हावा असं केंद्र आणि राज्य सरकारला वाटत आहे परंतु स्थानिकांना विश्वासात घेऊनच केला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नाणार प्रकल्पावर केंद्र सरकानं स्वाक्षरी केली असल्याची माहिती मिळताच शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केंद्र आणि राज्यसरकारवर जोरदार टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत अखेर मौन सोडलं असून या प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष करार झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार की नाही हे आगामी काळात समजणार आहे.

COMMENTS