देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री!

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री!

मुंबई – अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिन्यात दोन वेळा फडणवीस यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे.त्यामुळे उद्या बहूमत सिध्द करुन महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजीनामा देण्यापूर्वी फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने लाचारी पत्करली आहे म्हणूनच शिवसेनेने काल सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली. यापेक्षा लाचारी काय? आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातील जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं होतं. महाराष्ट्रात भाजपाला संपूर्ण जनादेश देत 105 जागा दिल्या. आम्ही शिवसेनेसोबत ही निवडणूक लढलो. भाजपाला जनादेश होता असं मी यासाठी म्हणतो आहे कारण 70 टक्के जागा आम्ही जिंकलो असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS