मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार अण्णा हजारेंची भेट !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार अण्णा हजारेंची भेट !

मुंबई  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला जाऊन अण्णांसोबत चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार मसुदा तयार करत असून मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रीय शिष्टमंडळ अण्णांची आजच भेट घेणार आहे. या भेटीनंतरच अण्णा हजारे आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अण्णा हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारनं ड्राफ्ट तयार केला असून सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी कालमर्यादा दिली असल्याची माहिती आहे. तसेच वेळेत लोकपाल नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन  देखील अण्णा हजारे यांना दिले आहे. निवडणूक प्रक्रियेतील सुधार वगळता इतर मागण्यांवर सरकारने यापूर्वीच अमलबजावणी सुरू केली आहे.

COMMENTS