नागपूर – विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये आज पुन्हा नाणार प्रकल्पावरुन जोरदार खडाजंगी झाली. विधानसभेत नाणारच्या प्रकल्पासंबधात निवेदन केलं. प्रकल्प कसा चांगला आहे, त्याच्यापासून धोका नाही तरीपण आपण जनतेवर प्रकल्प लादणार नाही, असंही सांगितलं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. नाणार प्रकल्पावरुन गोल गोल उत्तरं देऊ नका. प्रकल्प होणार की नाही, हो की नाही मध्ये उत्तर द्या अशी मागणी केली.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिलं. जयंतराव वकील झाले असते तर राजकारणापेक्षाही चांगले यशस्वी झाले असते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक किस्सा सांगितला. एक खटला सुरू होता. त्यावेळी वकिलांनी ज्याची तपासणी करत होते त्यांना विचारले तुम्ही हो किंवा नाही यामध्ये उत्तर द्या. त्यावर त्याने वकिलांनाही तुम्हालाही मी काही प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही त्याचं हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. तुमच्या बायकोनं तुम्हाला मारणं सोडून दिलं का ?हो की नाही ? मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. प्रत्येक प्रश्नाचं हो किंवा नाही असं उत्तर देता येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी या उदाहरणातून जयंतरावांना उत्तर दिलं.
COMMENTS