मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा भाऊ अटलजींच्या अंतयात्रेत, सुषमा स्वराज यांचीही घेतली भेट !

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा भाऊ अटलजींच्या अंतयात्रेत, सुषमा स्वराज यांचीही घेतली भेट !

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीच्या भावाने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंतयात्रेला हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. डेव्हिड हेडली याचा सावत्र भाऊ दायनाल गिलानी हा अंतयात्रेमध्ये सहभागी झाला होता. दायनाल यांनी ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडिओनंतर ही बाब समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचं एक शिष्टमंडळ परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भेटल्याचं दिसत आहे. त्या शिष्टमंडळामध्ये गिलानी याचा समावेश आहे.

गिलानी याला व्हिसा कसा दिला गेला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर डेव्हिड डेडली आपला सावत्र भाऊ आहे. मात्र त्याचा आणि आपल्या कुटुंबियाचा काहीही संबंध नसून आपण पाकिस्तान सरकारमधील एक चांगल्या प्रतिमेचे अधिकारी असल्याचं गिलानी याने स्पष्ट केलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या आर्मी प्रमुखांशी गळाभेट केल्यानंतर त्यावरुन वादंग उठल आहे. त्यातच हेडलीचा भाऊ थेट भारतात येऊन परराष्ट्र मंत्र्यांना भेटल्यामुळे दुसरे वादंग सुरू झाले आहे.

COMMENTS