कोल्हापूर – शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तरी गाठ शिवसेनेशी असल्याचा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा मानेंनी समाचार घेतला आहे. धैर्यशील माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे.
धैर्यशील माने यांची फेसबुक पोस्ट
गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो ” कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ”. आजवर महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.
अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. असंही माने यांनी म्हटलं आहे.
गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात…
Posted by Dhairyasheel Mane on Thursday, December 26, 2019
COMMENTS