पुणे – आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. आजही राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाजानं बंदची हाक दिली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय शांत न बसण्याचा पवित्रा मराठा समाजानं घेतला आहे. त्यामुळे एकूणच आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजानं सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा भडका उडणार असल्याचं दिसत आहे. कारण आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत काल बारामतीमध्ये पार पडलेल्या बैठकीत रणनिती आखली असल्याची माहिती आहे.
दरम्यान काल बारामतीमध्ये धनगर आरक्षण कृती समीतीची बैठक पार पडली. या बैठकीत धनगर आरक्षण कृती समिती ५ ऑगस्ट रोजी पुण्यात आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. या बैठकीत जर आंदोलनाची घोषणा करण्यात आली तर राज्य सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं दिसत आहे. धनगर समाजाच्या या निर्णयामुळे आता सरकारला मराठा आंदोलनानंतर धनगर आंदोलनालाही सामोरे जावे लागणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS