परळी वैजनाथ – पालकमंत्री धनंजय मुंडेंनी अधिवेशन संपताच 36 तासांत प्रकल्पग्रस्त उपोषणार्थींना दिलासा दिला आहे. प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना महानिर्मीती कंपनीत कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी लवकरात लवकर दिलासा देऊ असे आश्वासन त्यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन दिला. यावेळी प्रशासनाच्या परळी वैजनाथ वीज महानिर्मिती केंद्राचे महाव्यवस्थापक एन. एम. शिंदे उपस्थित होते. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना फोनवरून बोलून वीज निर्मिती केंद्र प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांना जागीच लिखित आश्वासन मिळवून दिले.
प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांच्याविषयी धनंजय मुंडे सुरुवातीपासून गंभीर आहेत. परळी वैजनाथ येथील वीज निर्मिती केंद्रासमोर गेल्या 5 दिवसांपासून उपोषणास बसलेल्या प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींचा प्रश्न हा निश्चितच गंभीर असून त्यावर तत्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडेंनी संबंधित महानिर्मिती प्रशासनाला दिले आहेत.
ज्या प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीना महानिर्मीतीमध्ये तीन वर्षे पुर्ण झाले आहेत अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना तंत्रज्ञ 3 म्हणुन कायमस्वरुपी सेवेत सामावुन घ्यावे, जाहिरात क्र.4/2019 मध्ये 746 पदांमध्ये वाढ करुन 1000 पदांची भरती करुन सर्व प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी आग्रही कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह 12 मार्चपासून आमरण उपोषणाला बसले होते. त्यांचे सविस्तर म्हणणे धनंजय मुंडेंनी ऐकून घेतले व तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तोडगा काढण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, नगर पालिकेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सूर्यभान मुंडे, माणिक फड, श्रीकृष्ण (भाऊड्या) कराड, विकास नागरगोजे, रामदास कराड आदी उपस्थित होते.
COMMENTS