बीड – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड येथील सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण कार्यालयात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष २४ तास कार्यरत हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान व जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात कसलीही समस्या असल्यास या हेल्पलाईन कक्षास कधीही संपर्क साधावा अशी माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.
या मदत कक्षात नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभागाकडून तज्ञ अधिकारी – कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांनी नागरिकांची अत्यंत नम्रपणे माहिती घेऊन ती आवश्यक विभागाकडे कळवावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
या हेल्पलाईन कक्षात दिनांक १५ एप्रिल पर्यंत सकाळी ७.०० ते १०.०० श्री. दिलीप कलकुटुकी मो. ७६६६५३३५३५, सकाळी १०.०० ते सायं. ८.०० श्री. प्रमोद सानप मो. ७३८५८३६५९९, रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत श्री. नितीन पतंगे मो. ७८८८२०७८७८ हे अधिकारी सेवा देतील.
त्याचबरोबर त्यांच्या मदतीला वेळा व तीन दिवसांनी तारखा बदलून श्री. हेमंत कुलकर्णी मो. ९९२१७१७११०, श्री. प्रशांत उगले मो. ८६०५७००९८८, श्री. श्रीकांत घुले मो. ९९७०२६०२८४, श्री. बालाजी नागरगोजे मो. ९४२०५७४७८७, श्री. लक्ष्मण बारगजे मो. ९८५०५९४७५७, श्री. नितीन पवार मो. ८९९९९३७६५३ आदींची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाबाबत कोणत्याही समस्यांकरिता वरील अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, ते अधिकारी आवश्यकतेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अन्य यंत्रणांशी समन्वय साधून त्या समस्या सोडवण्यासाठी काम करतील अशी माहिती जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली आहे.
COMMENTS