सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज ! VIDEO

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज ! VIDEO

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. आज दुपारी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेली 11 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आली आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान मुंडे यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटीव्ह आली आहे. आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती देखील सुधारत आहे.

COMMENTS