पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज हिंजवडीतील पीडित मुलींच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. तसेच पीडित मुलींच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत त्यांनी केली आहे. तसेच या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबीयांना दिला आहे.
हिंजवडीतील त्या पीडित मुलींच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन त्यांना धीर दिला, त्या मुलींच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत दिली. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द या कुटुंबीयांना दिला. https://t.co/LuaQaNqifI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 28, 2018
दरम्यान काही दिवसांपूर्वीच हिंजवडी येथे कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यातील एका मुलीचा १९ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम (वय २२) याला अटक केली होती. मंगळवारी या बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
COMMENTS