गेवराई – तालुक्यातील मौजे सावरगाव येथील मयत निता बांगर या ऊसतोड कामगार महिलेचा शिवशाही बसच्या धडकेमुळे रस्ते अपघातात मृत्यु झाला होता. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेलेल्या या महिलेच्या मृत्युची बातमी समजल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तत्परतेने सातारा पोलिस, परिवहन विभागाचे अधिकारी आणि मंत्री यांच्याशी संपर्क करून त्यांना दहा लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दि.१७ नोव्हेंबर रोजी त्यांनी मयत महिलेच्या कुटूंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील मौजे सावरगाव येथील ऊसतोड मजुर सातारा जिल्ह्यामध्ये ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. निता बांगर या ऊसतोड कामगार महिलेचा शिवशाही बसच्या धडकेमुळे रस्ते अपघातात मृत्यु झाला होता. ही घटना राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना समजल्यानंतर त्यांनी तत्परतेने या महिलेच्या कुटूंबियांना आधार देत सातारा येथील जिल्हा पोलिस, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क करून मयत ऊसतोड कामगार महिलेच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
शनिवार, दि.१७ नाव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सावरगाव येथे जाऊन ऊसतोड कामगार महिलेच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतूनही दोन लाख रुपयांची आर्थिक मदत या कुटूंबियांना मिळावी म्हणून तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना संपर्क करून या बाबतचे निर्देश दिले. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित उपस्थित होते.
ऊसतोड कामगारांचा राजकारणासाठी सातत्याने वापर करून घेणारे राजकारणी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यासाठी काही करताना दिसत नाहीत, मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंंडे यांनी ऊसतोड कामगाराप्रती आपले प्रेम प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुर महिलेचा सातारा जिल्ह्यात रस्ते अपघतात मृत्यु झाल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखून मयताच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत केली. ऊसतोड कामगारांचा प्रश्न अधिवेशनातही मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, कारखान्याचे संचालक राजेंद्र वारंगे, दिपक वारंगे, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, कुमारराव ढाकणे, खडकीचे सरपंच विकास सानप, पांडूरंग कोळेकर, सुभाष महाराज नागरे, माजी सभापती बबनराव मुळे, पांडूरंग गाडे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व सावरगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS