बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर मुंडेंनी फेसबुकवर आपला खुलासा केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. विरोधकांकडून मंत्री पदाचा राजीनामा आणि निवडणुक आयोगाकडे तक्रार केल्याने धनंजय मुंडे यांची राजकिय कारकिर्द धोक्यात आली होती. दरम्यान, संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने मुंडेंना दिलासा मिळाला. आरोपांनंतर ते पहिल्यांदा मतदारसंघात आले असताना येथील जनतेचे त्यांचे जंगी स्वागत केले.
याबद्दल भावना व्यक्त करीत असताना “अशा कठीण प्रसंगी आपण सर्व माझ्या पाठिशी उभे राहिलात त्याबद्दल शब्दांत आभार मानू शकत नाही. पण एक सांगतो आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरच्या कातड्याचे जोडे काढून जरी घातले तरी होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे,” असं सांगताना त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धनंजय मुंडे बीड व शिरुर कासार तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी समर्थकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. “जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात,” अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
लोणी (वारणी) ता.शिरूर येथे संत खंडोजीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या प्रसंगी उपस्थित राहिलो.२००२साली पहिल्यांदा इथे आलो तेव्हा बाबांनी माझ्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला होता. आज तीच माया या भागातील लोक माझ्यावर करत आहेत; सदैव ऋणात राहीन! pic.twitter.com/yeeII9L7PB
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 26, 2021
COMMENTS