आष्टी – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे अहमदनगर – बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देवळाली ता. आष्टी येथे प. पु. चैतन्य स्वामी यांच्या ४९व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास त्यांनी भेट दिली. राज्याचे सामजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन चैतन्य स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी गावकऱ्यांनी मुंडे यांचे जोरदार स्वागत केले.
गावकऱ्यांच्या आग्रही निमंत्रणामुळे मला चैतन्य स्वामी यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले असे यावेळी मुंडे म्हणाले. ‘मी अध्यात्मिक ठिकाणी भाषण करत नाही, परंतु नुकतेच कीर्तन सम्पलेल्या लाड महाराजांनी आज्ञा केल्यामुळे मी माईक हातात घेतला; जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून, मंदिराच्या भिंतीवर ‘तुमचे दुःख मला द्या, माझ्या वाट्याचे सुख तुम्हाला देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन’, अशा शब्दात मुंडेंनी गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.
२० वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे या गावात आले होते, त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून धनंजय भाऊ आमच्या गावी आले, त्यांना आलेलं पाहून आमच्यात नवचैतन्य आले असल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, डॉ. शिवाजी राऊत, सतिष शिंदे, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप, सुंदर गित्ते यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर ते गहिनीनाथगड ठिकठिकाणी स्वागत
गहिणींनाथगड येथील पारंपरिक पद्धतीने संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी अहमदनगर हुन गहिणींनाथगड कडे निघालेल्या ना. मुंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. विविध कार्यक्रम व देवळाली येथील सप्ताहास भेट आटोपून निघालेल्या मुंडेंचा स्वागत – सत्कार करण्यासाठी अक्षरशः मध्यरात्रीपर्यंत लोक रस्त्याच्या कडेला उभे राहिलेले गावोगाव दिसून येत होते.
COMMENTS