अंबाजोगाई – केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषदमध्ये सत्ता असतांनाही ज्यांना विकास कामे करता येत नाहीत. त्यांना फक्त टिका करून तोंडाची वाफ घालवता येते. आम्ही मात्र सत्ता नसतांनाही विकास कामे करून दाखवतो अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधार्यांना टोला लगावला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला आज धनंजय मुंडे यांनी भेट दिली व पाहणी केली. जलशुध्दीकरण मधुन निघणार्या शुध्द पाण्याची चव ही त्यांची चाखली.
या जलशुध्दीकरण प्रकल्पामुळे संपुर्ण गावाला शुध्द पाणी पुरवठा होत असुन, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते राजेश्वर आबा चव्हाण, विधान सभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शिवहार भताने, उपसभापती तानाजी देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेशभैय्या देशमुख, सरपंच सुधाकर माले आदी उपस्थित होते. माले यांनी प्रकल्पाची माहिती देऊन गावाला शुध्द पाणी पुरवठा करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
प्रदिप चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन
हातोला येथील राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते प्रदिप चव्हाण यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले.आज मुंडे यांनी हातोला येथे जाऊन प्रदिप चव्हाण व कुटुंबियांची भेट घुवन सांत्वन केले.
COMMENTS