बार्शी – दुष्काळाच्या चटक्यांपेक्षा जास्त चटके मोदी सरकारच्या काळात नागरिकांना सहन करावे लागत आहेत. आणि जाचक त्रासाला कंटाळलेल्या जनतेला यातून सुटका हवी आहे आणि म्हणून ही कष्टकरी जनतेची स्वाभिमानाची लढाई असल्याचा दावा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे यांनी केला आहे,ते बार्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राणा जगजितसिंह यांच्या प्रचाराच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी उमेदवार राणा जगजितसिंह,बार्शीचे आमदार दिलीप सोपल,उपस्थित होते.
भाजपच्या गेल्या 5 वर्षातील कामगिरीवर त्यांनी सडकून टीका केली. मोदी हे विकासाच्या मुद्दयावर न बोलता पवार साहेबांवर खालच्या पातळीत जाऊन टीका करत आहे.पुलवामा येथील शाहिद जवानांच्या नावावर मताचा जोगवा मांडत मड्याच्या टाळू वरील लोणी खाण्याच्या प्रकार करत आहेत.
गेल्या 5 वर्षात राज्यातील 16 मंत्र्यांचे कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार मी उघडकीस आणले आहेत.नोटबंदी, जीएसटी ने त्रस्त झालेले व्यापारी,हमीभाव मिळत नसलेला शेतकरी,आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या स्वाभिमानाची ही लढाई असून या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याच आवाहन धनंजय मुंढे यांनी केलं. तर मागच्या 5 वर्षात एवढया बोगस आश्वासनांचा पाऊस पडलेलं आहे की खरा पाऊस देखील पडेना गेलाय अशी खोचक टीका,राष्ट्रवादी काँग्रेस चे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केली. यावेळी सभेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्याचा सोपल यांनी दावा केला.
COMMENTS