हल्लाबोल यात्रेवर टीका करणा-यांना तूर घोटाळा, शेतक-यांची फसवणूक आठवते का ? –धनंजय मुंडे

हल्लाबोल यात्रेवर टीका करणा-यांना तूर घोटाळा, शेतक-यांची फसवणूक आठवते का ? –धनंजय मुंडे

कोल्हापूर –  राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवर टीका करणा-या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्या खात्यात झालेला तूरीचा 2500 कोटींचा घोटाळा आठवतो का ?  आणि स्वतःच्या कारखान्यासाठी शेतक-यांच्या नावावर कर्ज काढून केलेली फसवणूक आणि लूट माहीत आहे का ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुरगुड येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेत ते बोलत होते. तुरीपासून डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत झालेला 2500 हजार कोटी रुपयांचा घोटाळा पुराव्यासह विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी मांडला होता. या घोटाळ्यावरुन पुन्हा एकदा पणन मंत्री सुभाष देशमुख यांना त्यांनी लक्ष्य केल आहे.

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथील एका कार्यक्रमात पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी हल्लाबोल यात्रेवर टीका केली होती. त्यावर जोरदार टीका करत सुभाष देशमुख यांनी हल्लाबोल यात्रेचा धसका घेतला असल्यामुळेच ते आमच्यावर टीका करीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच स्वतःच्या कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून त्यांनी मोठा घोटाळा केला असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे. तसेच आम्ही आंबाबाईचा रथ ओढला असून राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो असं साकडं आम्ही आंबाबाईला घातलं असल्याचंही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS