पक्ष वेगळा असला तरी मी मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतोय – धनंजय मुंडे

पक्ष वेगळा असला तरी मी मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतोय – धनंजय मुंडे

नवी मुंबई – गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वारशाचा हक्कदार मी कधीच नाही. जे चालवत आहेत ते सक्षमपणे चालवत आहेत. भले मी त्यांच्या पोटी जन्म घेतला नसेल तरी 22वर्ष त्यांच्या संघर्षाच्या काळात मी त्यांच्या बरोबर होतो. त्यामुळे गोपीनाथ मुंडेच्या विचारांचा खरा वारसदार मीच असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडेनी केले आहे.

नेरुळ येथे गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार आपण असल्याचे सांगितल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंडे साहेबांची स्वप्न, इच्छा काय होती हे मला माहित आहे. त्याची जाणीव देखील मला आहे. साहेबांनी ज्या सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष केला. आज त्याच प्रश्नांसाठी विरोधी पक्ष नेता म्हणून मी संघर्ष करीत आहे. माझा पक्ष वेगळा असला, विचार धारा वेगळा असला तरी देखील गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मी करत आहे. त्यांमुळेचं त्यांच्या विचारांचा वारसदार मीच असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला आणि गोपानाथ मुंडे साठी आपले परिवार कसे झिजले याचा पाडा वाचला. आपले वडील आण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी स्वत:चे आयुष्य चंदनासारखे झिजवले असूनही आम्हा कुटुंबीयांना त्यांनी बाजूला केले असल्याचे सांगितले. तसेच ज्या ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली जाते त्या त्या ठिकाणचे पहिले निमंत्रण मलाच येते यातच माझे भाग्य आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमध्ये राहूनही मरेपर्यंत गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा सुरू ठेवणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले.

COMMENTS